रत्नागिरी पोलिसांकडे अक्षम्य दुर्लक्ष

December 20, 2008 9:20 AM0 commentsViews: 14

20 डिसेंबर, रत्नागिरीदिनेश केळुस्करहातात नुसतं शस्त्र असून शत्रूचा मुकाबला करता येत नाही. तर ते शस्त्र चालवण्यात व्यक्ती पारंगत हवी. रत्नागिरीच्या पोलिसांना बंदूक चालवणं सोडाच, ती हाताळता येते की नाही याबाबतही शंका आहे. यात पोलीसांचा दोष नाही. कारण गेली तीन वर्षं गोळीबार मैदानाच्या अभावी रत्नागिरी पोलिसांना गोळीबाराचा सरावही करता आलेला नाही. त्यातच त्यांना दिलेल्या बंदुकाही अगदी जुनाट आहेत. आणि त्यावर कहर म्हणजे कोकणच्या पोलीस महानिरीक्षकांना याची माहितीच नाही. रत्नागिरी पोलीसांवर आता सागरी सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडलेली आहे. त्यामुळे इथला प्रत्येक पोलीस अत्याधुनिक शस्त्रासह सज्ज असायला हवा.त्यातही जर तीन तीन वर्षं फ़ायरींगची प्रॅक्टीस नसेल तर बंदूका असूनसुध्दा पोलीस काय करणार ?पोलीसांकडे असलेली सध्या खटक्याची थ्री नॉट थ्री रायफ़ल आहे . यातल्या या मॅगझीनमध्ये राउंड लोड करून बोल्ट ओढून फायर करेपर्यंत बराच वेळ जातो. त्यातही या जुनाट झालेल्या या बंदुका सराव नसल्यामुळे आता कामही देत नाहीत. सरावासाठीलागणार्‍या गोळीबार मैदानाची जागा जिल्हाधिकार्‍यांनी तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी पोलीस अधिकार्‍यांची मागणी आहे. "अ‍ॅडव्हान्स जागा ताबडतोब पझेशन देण्यास कलेक्टरला आदेश आलेले आहेत. आम्ही गेलो तर त्यांना ताबडतोब सातबारा आमच्या नावावर करावा लागेल" असं रत्नागिरीचे आयजीपी के. के. पाठक यांनी सांगितलं.दहशतवादी हल्ल्यांसाठी अतिरेकी आता अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत. अशा वेळी जुनाट बंदुका घेतलेले आणि सराव नसलेले पोलीस त्यांचा मुकाबला कसा करणार ? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

close