दुष्काळाच्या झळा : गावंच्या गावं स्थलांतरीत

December 30, 2012 3:06 PM0 commentsViews: 39

30 डिसेंबर

मराठवाड्यातल्या दुष्काळाची भीषणता फक्त कोरड्या शेतांवरुन दिसतेय असं नाही तर इथं चक्क गावच्या गावं स्थलांतरीत होत आहेत. बीड जिल्ह्यातील शिकापूर गावातील जवळपास प्रत्येक घरातील पुरुष रोजगाराच्या शोधात इतर गावांमध्ये गेले आहेत. त्यामुळे या गावात फक्त वृद्ध पुरुष आणि स्त्रिया उरल्या आहेत. इथं रोजगार हमी योजनेची कामंही मिळत नसल्याची तक्रार या गावकर्‍यांनी केलीये. या गावातील परिस्थिती जाणून घेतलीय आमचा करस्पाँडंट माधव सावरगावेनं…

close