‘दारू नको, दूध प्या’

December 31, 2012 3:58 PM0 commentsViews: 43

31 डिसेंबरनव्या वर्षाचं स्वागत करताना 'दारू नको, दूध प्या' हा संदेश देण्यासाठी पुण्यातल्या ब्राव्हो ग्रुपच्या वतीनं जन जागरण रॅली काढण्यात आली. तर हाच संदेश तरुणांना देण्यासाठी खाणे मारुती ट्रस्टच्या वतीनं मोफत दूध वाटप करण्यात आलं. नववर्षाचा स्वागत करताना दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात. अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला. या उपक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

close