पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूची साथ

December 20, 2008 9:25 AM0 commentsViews: 62

20 डिसेंबर, पिंपरी-चिंचवडसागर शिंदे पिंपरी चिंचवड शहर हे एक झपाट्याने वाढणार शहर बनलय .मात्र याच शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे. शहरात डेंग्यूचे 362 तर हिवतापाचे 396 पेशंट्स आढळून आलेत.आता पर्यंत अनेक डेंग्यू रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.पिंपरी चिंचवड शहरातल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचरा टाकण्यात येतोय. त्यामुळे शहरातले नाले डास उत्पतीचं केंद्र बनलेत. या नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. औषध फवारणी होत नाही.पालिकेच्या या गलथान कारभाराचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढतायंत.पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी नागकुमार कुणचगी यांनी आपली चूक कबुल केलीय.पण सोबतच नागरिकांनीही स्वच्छता ठेवायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. "आम्हr जवाबदार नाही असं आम्ही म्हणत नाही आमची पण काही प्रमाणात जवाबदारी आहे परंतु नागरिकांनी सहार्काय करायच फार महत्त्वाचं आहे" असं पिंपरी चिंचवडचे मुख्य आरोग्य अधिकारी नागकुमार कुणचगी यांनी सांगितलं.दरम्यान नगरसेवक मारूती भापकर यांनी यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. "दिवसेंदिवस डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढत आहे.वेगवेगळ्या ठिकाणी अनेक रूग्ण डेंग्युने दगावलेत आपल्या प्राणाला मुकलेत.महापालिका कागदी घोडे नाचवण्याच शिवाय काहीच करत नाही" असं ते म्हणाले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चालु आर्थिक वर्षात आरोग्य विभागासाठी 45 कोटी रूपयांची तरतुद केली आहे. मात्र यातले किती पैसे आणि योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरतात, यावरच शहरातली आरोग्याची परिस्थिती सुधारणार का ? हे अवलंबून आहे.

close