भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये 453 रन्स

December 20, 2008 10:57 AM0 commentsViews: 1

20 डिसेंबर मोहालीमोहाली टेस्टमध्ये भारताने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये सर्वबाद 453 रन्स केले. दुस-या दिवशी सकाळी गौतम गंभीर आणि राहुल द्रविडच्या शानदार बॅटिंगमुळे भारताने 350 रन्सचा टप्पा आरामात ओलांडला. पण लंचनंतर भारतानं पुढच्या 4 विकेट झटपट गमावल्या. लंचनंतर चौथ्याच ओव्हरमध्ये गौतम गंभीर आऊट झाला. त्याने 179 रन्स केले. गंभीरने या वर्षांतले एक हजार टेस्ट रन्सही पूर्ण केले. दुस-या बाजूने द्रविडनेही आपली 26वी टेस्ट सेंच्युरी ठोकली. द्रविडलाही स्वॉननेच आऊट केलं. त्याने 136 रन्स केले. द्रविड पाठोपाठ सचिन 11 रन्स करून आऊट झाला. तर लक्ष्मणही लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर युवराज सिंग 27, कॅप्टन महेंद्र सिंग धोणी 29आणि हरभजन सिंग 24 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतले. इंग्लंडतर्फे स्वॉन आणि फ्लिंटॉफने 3-3विकेट्स घेतल्या.अमित मिश्राने उपयुक्त 23 रन्स केले. तर इशांत शर्मा एक रन करून नॉट आऊट राहिला.

close