सत्तेसाठी विरोधक आतुर – नारायण राणे

January 4, 2013 4:02 PM0 commentsViews: 42

04 जानेवारी

सरकारनं जाहीर नव्या औद्योगिक धोरणावरून वाद पेटलाय. हे धोरण बिल्डर्सच्याच फायद्याचं असल्याचा आरोप आज पुन्हा एकदा भाजपनं केला. नवं औद्योगिक धोरण तज्ज्ञांचं मत विचारून नाहीतर बिल्डर्सचं मत विचारून केलंय असं भाजपनं म्हटलंय. ठरवलेली उद्दिष्ट सरकारच्या आवाक्याबाहेर आहेत, अशी टीका भाजपनं केलीय. औद्योगिक धोरणावर टीका करणार्‍या विरोधकांना उद्योगमंत्री नारायण राणेंनी उत्तर दिलंय. विरोधक सत्तेसाठी आतुर असल्यामुळे बेजबाबदार वक्तव्यं करत आहेत, अशी तोफ राणेंनी डागलीय.

close