उद्योगांना लोडशेडिंगमुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

January 4, 2013 4:07 PM0 commentsViews: 4

04 जानेवारी

राज्य लोडशेडिंग मुक्त करण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत उडून गेली असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्योगांना लोडशेडिंगमुक्त करण्याची घोषणा केलीय. येत्या मे पासून ज्या इंडस्ट्री वीज बील थकविणार नाही त्यांना लोडशेडिंग मधून वगळण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही घोषणा राज्यातील उद्योजकांना मोठा दिलासा आहे. नागपूर येथील एनटीपीसीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकार पुरेसा गॅस पुरवठा करत नसल्यानं पूर्ण क्षमतेनं वीज निर्मिती करता येत नाही असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नुकतच सरकारनं राज्याचं औद्योगिक धोरण घोषित केलंय आणि त्यात उद्योगांना प्रोत्साहन देणार असल्याची सरकारने घोषणा केली होती.

close