…तर संमेलन उधळून लावू :संभाजी बिग्रेड

January 5, 2013 11:59 AM0 commentsViews: 41

04 जानेवारी

चिपळूण येथे होऊ घातलेलं 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनावर परशुरामाचीच कुर्‍हाड कोसळलीये. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामचं चित्र आणि कुर्‍हाडीसारख्या परशू या शस्त्राचंही चित्र छापण्यात आलंय. पण परशुराम हे ब्राम्हणांचं प्रतीक आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय. परशुरामाचं आणि परशूचं चित्र काढलं नाही तर आम्ही हे संमेलन उधळून लावू असा कडक इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय.

close