राष्ट्रवादीचे आमदार चोरताय आपल्या कारखान्यासाठी पाणी

January 5, 2013 2:42 PM0 commentsViews: 13

05 डिसेंबर

एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दुष्काळावर चिंता व्यक्त करत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार आपल्या कारखान्यासाठी पाणी चोरत असल्याचं समोरं आलंय. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण मद्यनिर्मितीसाठी सीना-कोळेगाव धरणातून पाणी चोरलं जातंय. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या परांड्यातल्या मद्य निर्मिती कारखान्यासाठी शेतातून पाइपलाईन टाकली जातेय. यात शेतकर्‍यांच्या पिकाचं नुकसान होतंय. भूसुरुंगाच्या स्फोटानं शेतकर्‍यांच्या घरांना तडे जात आहे. याबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलायला नकार दिला.

close