ट्रायडन्ट हॉटेलात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश नाकारणार

December 20, 2008 11:39 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर मुंबईदहशतवादी हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येईल, असं हॉटेलचे अध्यक्ष रतन केसवानी यांनी सांगितलं. इतर देशांच्या पाहुण्यांबाबत हा नियम पाळण्यात येणार नाही, असं केसवानी यांनी स्पष्ट केलं. दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य ठरलेलं हॉटेल ट्रायडेंट रविवारी 21 तारखेला सकाळी 11.30 वाजता पुन्हा उघडणार असल्याचं केसवानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हॉटेलच्या ओपनिंगपूर्वीच 100 रुम्सचं बुकिंग पूर्ण झालं आहे. हॉटेल जरी रविवारपासून उघडलं जाणार असलं तरी नवं वर्षाच्या स्वागताची जंगी पार्टी मात्र होणार नसल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. तसंच हॉटेल ओबेरॉय उघडण्यासाठी आणखीन 6 ते 7 महिने लागणार आहेत. या अगोदरचं 30-35% बुकिंग रद्द झालं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही अधिक सर्तक असणार आहोत असं हॉटेलतर्फे सांगण्यात आलं.

close