‘केबीसी’मध्ये सन्मित कौर यांनी जिंकले 5 कोटी

January 5, 2013 5:03 PM0 commentsViews: 40

05 जानेवारी

'बिलकुल सही जवाब..और आप जीत गयी 5 करोड रुपये' अशी उत्सफुर्त घोषणा पुन्हा एकदा केबीसीमध्ये ऐकायला मिळाली. आणि यावेळी 5 कोटी जिंकले आहे मुंबईतील एका गृहिणीने. सन्मित कौर यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये पाच कोटी जिंकण्याचा मान मिळवला आहे. पाच कोटी जिकणारी सन्मित कौर या दुसर्‍या स्पर्धक आहेत. 37 वर्षांच्या सन्मित मुंबईतल्या गृहिणी आहेत. या अगोदर उत्तरप्रदेशमधील रहिवाशी सुशील कुमारने पाच कोटी जिंकले होते. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मित कौर यांना चेक प्रदान करण्यात आलाय.

close