दुष्काळाचा कहर : नद्या कोरड्या, विहिरीत दूषित पाणी !

January 7, 2013 12:10 PM0 commentsViews: 74

07 जानेवारी

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील नद्या, विहिरी, धरणं, ओढे कोरडी पडली आहे. अहमदपूर तालुक्यातील गळाटी नदीत यंदा पावसाचा एक थेंब सुध्दा पडला नाही. त्यामुळे या परिसरातील हजारो एकर शेती नष्ट झाली असून शेतकरी हतबल झाले आहे. या नदीवर वसलेल्या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या नदी लगत असलेल्या विहिरीत असलेलं पाणी दूषित झालंय. गावकर्‍यांना हेच पाणी पिण्यासाठी वापरण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी दूषित पाणी प्यायल्यानं गावकरी आजारी पडत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात दूषित पाणी प्यायल्यामुळे 200 माकडांचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या महिन्यात घडली. आता अशीच अवस्था अहमदपूरमध्ये झाली आहे त्यामुळे अशी घटना घडू नये अशी भीती बाळगली जात आहे.

close