महाबळेश्वरमध्ये गोठले दवबिंदू

January 7, 2013 1:49 PM0 commentsViews: 78

07 जानेवारी

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर शहरापासून 2 कि.मी. अंतरावरच्या वेण्णा लेक परिसरात पारा 2-3 अंशावर आलाय. त्यामुळे या परिसरात दवबिंदू गोठलेय. यावर्षातली ही दुसरी वेळ आहे. या परिसरातल्या गवताच्या पात्यांवरील दवबिंदू गोठल्यानं सगळा परिसर पांढरा शुभ्र दिसतोय. हिरव्या रानावर दवबिंदूंची पांढरी चादर पसरलीय असं दृष्य महाबळेश्वरमध्ये पहायला मिळतंय.

close