‘अ ॅनिमल फॅशन शो’

January 7, 2013 1:56 PM0 commentsViews: 48

07 जानेवारी

इंडियन सोसायटी फॉर ऍनिमल वेलफेअर आणि लायन्स क्लबनं नागपूरमध्ये ऍनिमल फॅशन शो आयोजित केला होता. निराधार पशुपक्षांच्या मदतीसाठी आंध्र असोसिएशनच्या मैदानावर पेटवॉक करण्यात आला. या शोमध्ये सहभागी स्पर्धक आपल्या मालकांसोबत संगीताच्या तालावर रॅम्पवर आले. या शोमध्ये विविध जातीचे लॅब, जर्मन शॅफर्ड, बॉक्सर, पॉमेरीयन, शीट झू, पग, बीगल, पोबीटन आदींचा समावेश होता. देशात वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून मानव संकटात सापडत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वाघांना वाचवा, तसेच देशात एकता कायम ठेवा असा संदेश या शो मधून देण्यात आला

close