दुष्काळाचा कहर : बागा जळाल्यानं बळीराजा हळहळला !

January 9, 2013 1:58 PM0 commentsViews: 53

09 जानेवारी

औरंगाबाद जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. खरीपाचं पीक हातून गेल्यानंतर रब्बी पिकांचीही तिचं अवस्था झालीय. हजारो हेक्टरवरील रब्बीच्या ज्वारीचं पीक वाळून गेल्यानं चाराही उपलब्ध होऊ शकला नाही. त्याशिवाय मोसंबीनं शेतकर्‍यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय. पैठण तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मोसंबीच्या बागा वाळून गेल्या आहेत. त्यामुळं चारा नाही, शेतीचं उत्पन्न नाही, हाताला काम नाही आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अडचणीत शेतकरी अडकले आहेत. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यातील परिस्थिती..

close