राज ठाकरेंविना मेळावा संपला, कामगार नाराज

January 11, 2013 11:50 AM0 commentsViews: 21

11 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सिंहासोबत असलेल्या फोटोचे बॅनर्स बसला लावून, कारवाईची तमा न बाळगता मुंबईत आलेले जवळपास 30 हजार एसटी कामगार राज साहेबांना न ऐकतचा गावी परतावे लागले आहे. राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन हात उचावून निघून जरी गेले असते तरी ते आमच्यासाठी खूप होते. त्यांनी दोन मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे होता. त्यांना पाहण्यासाठी,ऐकण्यासाठी आम्ही इतक्या दूरहून आलो, पण साहेब आले नाही अशी खंत एसटी कामगारांना व्यक्त केली. पण ते आले नाही तरी त्यांनी आमच्या मागण्या लावून धराव्यात अशी आशाही बाळगली.

मनसेच्या वाहतूक सेनेचा मोर्च्याचा दिवस जसा जवळ आला त्याचे पडसाद अगोदरच्या दिवशी पाह्याला मिळाले. गुरूवारपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो एसटी कामगारांनी मुंबईची वाट धरली. एकच वेळी जवळपास 30 हजार कामगारांनी रजा टाकली. परिणामी एसटीची वाहतूक अक्षरश: ठप्पच झाली. काही ठिकाणी फेर्‍या रद्द करण्यात आल्या. आज पहाटे कामगाराचे जथेच्या जथे मुंबईत दाखल झाले. सकाळी निघालेला मोर्चा दुपारी आझाद मैदानावर धडकला. मोर्च्याचे रुपांतर मेळ्याव्यात झाले. आणि तिथे आलेल्या कामगारांना अविनाश अभ्यंकर, राम कदम, प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर या नेत्यांनी संबोधित केलं. आपल्या विविध मोर्चाचे मागण्यांसाठी राज्यातील हजारो एसटी कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मेळाव्यानंतर हे कामगार आता मुंबईहून आपल्या गावाकडे निघाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मनसे तुमच्या पाठिशी राहिल असा विश्वास यावेळी आमदारांनी या एसटी कामगारांना दिला. सभागृहात, सभागृहाबाहेर हा लढा सुरूच ठेवू असं आश्वासन यावेळी त्यांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित राहतील अशी कामगारांना आशा होती. पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या मेळाव्याला आले नाही. या मेळाव्याद्वारे एकप्रकारे मनसेनं मंुबईत शक्तीप्रदर्शन केलं आहे.

close