व्यवस्था संघर्षातून उभं राहणार तेच खरं साहित्य -कोत्तापल्ले

January 11, 2013 4:53 PM0 commentsViews: 39

11 जानेवारी

व्यवस्थेशी संघर्ष करत जे साहित्य उभं राहत तेच खरं साहित्य असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलं. तसंच राज्यात पडलेल्या दुष्काळपरिस्थितीवर दुख व्यक्त केलं. त्याचबरोबर कर्नाटक सरकार बेळगावमध्ये मराठी माणसांना दुय्यम दर्जाने वागवत आहे. कर्नाटकची प्रांतवार रचना होण्याआधी 500 वर्षांपेक्षा अधिक काळाहून लोकं तिथे राहत होती. मग बेळगावमध्ये मराठी भाषिक आताच गेले आहे का ? हे मराठी भाषिक 100 वर्षांपासून तेथे राहत आहे. मात्र कर्नाटक सरकार मराठी माणसाला पळवून लावत आहे. मराठी माणसं तिथं परदेशी नागरीकासारखे राहत आहे. हे अत्यंत निषेर्धाह आहे. कर्नाटक सरकारचा मी कडक शब्दात निषेध करतो. मराठी माणसं ही भारतीय नागरीक आहे हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावे आणि केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा अशी मागणीही कोत्तापल्ले यांनी केली.

close