…तर दुष्काळग्रस्त उद्या नक्षलवादीही बनतील -पवार

January 14, 2013 11:36 AM0 commentsViews: 42

14 जानेवारी

दुष्काळग्रस्तांच्या समस्या सोडवल्या नाहीत आणि त्यांना पाणी दिलं नाही तर हेच दुष्काळग्रस्त आपल्या हक्कांसाठी उद्या नक्षलवादीही बनतील. त्यामुळे सरकारनं दुष्काळग्रस्त भागासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केली. सिंधुदुर्गात झालेल्या सरपंच मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख म्हणून ते बोलत होते. आजची धरणं ही शेतकर्‍यांसाठी निरूपयोगी असल्याचं सांगत धरणांचं पाणी शेतकर्‍यांना कसं मिळेल यासाठी सर्वात आधी प्रयत्न झाले पाहिजेत असंही ते म्हणाले.

close