सायमंडलाही बसला शेअर मार्केटचा फटका

December 20, 2008 4:18 PM0 commentsViews: 2

20 डिसेंबर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त टेन्शन दिलं आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅण्ड्र्यू सायमंडला मैदानाबाहेर जबरदस्त टेन्शनला सामोरे जावे लागत आहे.याबाबत बातमी अशी अ‍ॅण्ड्र्यू सायमंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे माजी कोच जॉन बुकानन यांनी गुंतवणूक केलेली स्ट्रॉम फायनानशियल ही कंपनी बुडीत गेली आहे.आणि त्यामुळे या दोघांनाही खूप नुकसान झाल्याचं समजतंय. देशभरातील, जवळजवळ 13 हजार ग्राहकांना यामुळे आपले पैसे गमवावे लागले आहेत. कंपनीने जास्त पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवल्यामुळे काही ग्राहकांना तर आपल्या घरांवरही पाणी सोडावं लागलं आहे. सायमंडचे मॅनेजर मॅट फॅरन यांनी याबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. दरम्यान, सायमंडसारख्या ग्राहकांमध्ये झालेलं नुकसान भरून काढायची क्षमता आहे. पण इतरांसमोर मात्र आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलियन स्टॉक मार्केट यावर्षी जवळपास 44 टक्क्यांनी खाली आलं आहे.

close