भारत-पाक संघर्षात सीमावासीयांचं मरण !

January 14, 2013 4:58 PM0 commentsViews: 8

मुफ्ती इस्लाह, चुरांदा, जम्मू काश्मीर

14 जानेवारी

भारत-पाकिस्तानमधल्या संघर्षात होरपळत आहेत, नियंत्रण रेषेवरची निष्पाप गावं. इथल्या लोकांवर स्वतःच्या गावातच निर्वासितासारखं राहण्याची वेळ आलीय. नियंत्रण रेषेवरच्या चुरांदा गावातून हा ग्राऊंड रिपोर्ट…

नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीत उरीभोवतालच्या हाजीपूर पर्वतरांगा शांत राहिल्या. पण, इथल्या गावकर्‍यांना परिचीत असणारा आवाज पुन्हा एकदा ऐकू येतोय..तो म्हणजे गोळीबार.. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या चुरांदा या गावानं गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानकडून होणार्‍या आगळीकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. 6 जानेवारी रोजी मोहम्मद दिन यांच्या घरातल्या 17 जणांवर मृत्यूचं संकट ओढवलं होतं. पाकिस्ताननं फेकलेला बॉम्ब त्यांच्या घरापासून काही अंतरावर पडला. पण, 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात दुसर्‍या एका कुटुंबातल्या 3 जणांचा जीव गेला. तेव्हापासून हे गाव अशांत आहे.चुरांदा, उरी आणि मेंढारमध्ये सुरू झालेली ही चकमक अचानक सुरू झाल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. पाकिस्तानच्या मुजाहीद कोणतंही कारण नसताना अचानक गोळीबार सुरू केला. तेव्हापासून पाकिस्तानी सैनिक भारतीय भूमीवर हल्ला करतायत आणि त्यात नियंत्रण रेषेवरचे नागरिक भरडले जात आहे. दोन्ही देशांची भाषा ही युद्धाची नाही तर शांततेची असावी, हीच इथल्या लोकांची इच्छा आहे.

close