गृह प्रदर्शन नव्हे अंग ‘प्रदर्शन’

January 14, 2013 3:23 PM0 commentsViews: 40

14 जानेवारी

मुंबईत स्वत:चं घर असावं अशी स्पप्न सगळेच पाहतात. असं स्वप्न पाहणार्‍या मुंबईकरांना चक्क अंगप्रदर्शन पाहण्याची वेळ आली. त्याचं झालं असं की, नवी मुंबईत भरवलेल्या गृह प्रदर्शनामध्ये ग्राहकराजाला आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी कमालीची शक्कल लढवली. प्रदर्शनात विदेशी महिलांचा डान्स शो आणि अर्धनग्न पुरुषांना पुतळ्यासारखे उभे करण्यात आले. एका बिल्डरच्या स्टॉलवर तर स्विमिंग पुलजवळ स्विमिंग सुटमध्ये मुलींना बसवण्यात आले आहे. मागच्या वर्षीच्या गृहप्रदर्शनामध्ये तर मुलींचा डान्सही ठेवण्यात आला होता. अशा 'प्रदर्शना'ची गरज काय असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

close