सर ब्रॅडमन आणि कोलकत्याचं अतूट नातं

December 20, 2008 11:24 AM0 commentsViews: 2

20 डिसेंबर कोलकाताटेस्ट क्रिकेटमध्ये 99.96 ची सरासरी राखणारे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन खाजगी आयुष्यात तसे मितभाषी होते. रिटायर्डमेंटनंतर तर ते लोकांच्या फारसे संपर्कात नसायचेच. पण कोलकात्यातले मुदेर पथेरिया हे असे गृहस्थ आहेत जे अनेक वर्षं ब्रॅडमन यांच्याशी पत्रातून संवाद साधत होते. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्रांना खुद्द ब्रॅडमन उत्तरही द्यायचे.कोलकात्याचे मुदेर पथेरिया तेव्हा फक्त 16 वर्षांचे होते. आणि इतर भारतीयांप्रमाणेच क्रिकेट मॅच त्यांच्यासाठी जीव की प्राण होता.एकदा त्यांच्या कॉलनीत आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचसाठी त्यांनी दस्तुरखुद्द सर डॉन ब्रॅडमन यांनाच पत्र लिहून प्रमुख पाहुणे म्हणून यायची विनंती केली.ब्रॅडमन त्या मॅचसाठी येऊ शकल नाही. पण त्यांनी स्वत: पत्र लिहून येणार नसल्याचं कळवलं आणि त्यासाठी दिलगिरीही व्यक्त केली.पथेरिया सांगतात, ते पत्र बघून मी हरखूनच गेलो.पत्र टाईप केलेलं होतं. पण त्याचं पाकीट माझ्यासाठी विशेष महत्त्वाचं होतं. कारण त्यावरचा पत्ता, माझं नाव ब्रॅडमन यांच्या हस्ताक्षरात होतं. त्या पाकिटाला ब्रॅडमन यांचा स्पर्श झाला होता ही गोष्टच माझ्यासाठी तेव्हा खूप होती.पथेरिया यांच्याकडे ब्रॅडमन यांची तब्बल 4 पत्रं आहेत. शिवाय त्यांची सही असलेली 14 पोस्टर्सही. पथेरिया ही पोस्टर्स अ‍ॅडलेडला सर डॉन यांच्या घरी पाठवून द्यायचेआणि ते तितक्याच तत्परतेने त्यावर सही करून कोलकात्याला परत पाठवून द्यायचे.1828 – 29मध्ये इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये सर डॉन ब्रॅडमन राखीव खेळाडू होते. त्यावेळचा हा दुर्मिळ फोटो पथेरिया यांच्याकडे आहे. आणि त्यावरही डॉन ब्रॅडमन यांची सहीही आहे.

close