धुळे दंगलीचं भीषण वास्तव !

January 16, 2013 12:32 PM0 commentsViews: 53

प्रशांत बाग आणि अविनाश सोनवणे, धुळे

16 जानेवारी

धुळयात झालेल्या दंगलीचा तपास आता सीआयडीला देण्यात आलाय. पण अत्यंत किरकोळ कारणानं ही दंगल पेटली कशी ? वर्षानुवर्ष सोबत राहणारी माणसं एकमेकांच्या जीवावर उठली कशी ? अवघ्या 10 मिनिटात वादाचं रूपांतर दंगलीत का झालं ? पण खरोखर हे सत्य बाहेर येईल का ही शंका धुळेकरांना आहे. काय आहे या दंगलीमागील भीषण वास्तव, यावर प्रकाश टाकणारा आयबीएन लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट.

"कोई भी मजहब मे फसाद को कोई जगह नही है. ऐसा होता अगर हिंदू फसाद होता तो हिंदुस्तान इतना बडा कैसे होता..दो चार सरफीरे लोग होते है उनकी वजह से गाव बदनाम होता है मजहब बदनाम होता है" अशी खंत ऊर्दू शाळेतले शिक्षक झाकीर हाफीज यांनी व्यक्त केलीय. 4 वर्षांपूर्वी झालेल्या भीषण दंगलीच्या आठवणी अजूनही ताज्या असताना मच्छीबाजारात पेटलेल्या या दंगलीनं पुन्हा एकदा धुळेकर हादरले आहेत. अवघ्या 10 मिनिटात पसरलेली ही दंगल पूर्वनियोजित होती अशी भावना अनेक धुळेकर व्यक्त करतायत. तर सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, दंगल होऊ शकते, या भीतीपोटी लोक तयारी करून बसले होते. म्हणून दंगल एवढ्या वेगाने भडकू शकली. सामाजिक कार्यकर्ता अशफाक शेख म्हणातात, 2008 मध्ये झालेल्या दंगलीत खूप मोठं नुकसान झालं होतं मला असं वाटतंय की, या भागात पुन्हा जर असं झालं दंगल घडली तर काय करायचं अशी भीती होती यामुळंच तयारी करुन ठेवली होती.

दंगलीनंतर राजकीय गणितं बदलतात. म्हणूनच निवडणुकांवर डोळा ठेवून दंगली भडकावल्या जातात अशीही भावना व्यक्त होतेय..

या दंगलीमागे राजकारण राजकीय फायद्यासाठी राजकारण्यांनी केलेली दंगल मतांच्या राजकारणासाठी केलेली ही दंगल राजकीय लोकांच्या मागे लागून संसाराचं वाटोळं होतं असं जळजळीत प्रतिक्रिया अरुण धुमाळ यांनी दिली.वर्षानुवर्ष सख्खे शेजारी असलेले या दंगलीत एकमेकांच्या जीवावर उठले. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. पोलिसांच्या गोळीबारात काहींच्या घरातील कर्ते मृत्युमुखी पडले. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित करतायत. 'ये दंगा नही है ये झगडा था 2 लोगोका ये पुलीस ने भडकाया इस केलीए पुलीस जिम्मेदार है इसके पिछे जरुर कोई है खोज होनी चाहिए' असा आरोप पीडित करत आहे.

पोलिसांनी मात्र त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळलेत. केरोसीनचा काळाबाजार आणि भंगार व्यवसायात करोडपती झालेले माफिया ही आहे. धुळ्याची सध्याची ओळख, अनेक अवैध धंद्यामुळं एकेकाळी शांत असलेलं धुळे शहर आता अशांत झालंय. या माफियांना मिळणार्‍या राजकीय पाठबळामुळं हे माफिया अधिकंच शिरजोर झाले आहे. अशा माफियांना तडीपार करण्याची हिम्मत प्रशासनानं दाखवली तरी सरकार मात्र त्यांची तडीपारी लागलीच रद्द करतं. आणि याच अवैध धंद्यांचं साम्राज्य चालवण्यासाठी राजकारणात प्रवेश केलेले माफिया अशा प्रकारच्या दंगली घडवतात,आपली पोळी शेकण्यासाठी प्रत्येक समाजात असलेल्या या माफियांनी जातीय दंगलींना आपलं हत्यार केलंय.

अवैध धंद्याचं आगार असलेल्या धुळ्यात गुन्हेगांराना राजकीय आशीर्वाद मिळतो, हे उघड गुपित आहे. या दंगलीनंतर तरी खर्‍या दंगलखोरांवर कारवाई होणार का, हा प्रश्न धुळेकर विचारत आहेत.

close