उगवत्या सूर्याच्या प्रदेशात

January 16, 2013 2:11 PM0 commentsViews: 65

घनदाट जंगलाने भरलेले डोंगर, टेकड्यांमधून खळाळत वाहणार्‍या नद्या, घाटमाथ्याचे वळणावळणाचे खडतर रस्ते….इथलं जगणं निसर्गाच्या तालावरचं….जैवविविधतेने नटलेला हा प्रदेश…विकासापासून मात्र वंचित राहिलेला..मुंबईसारख्या शहरात जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा चार वाजता अरुणाचल अंधारात बुडतं…पण अंधारानंतर काम उरत नाही…आणि मन रमेल अशी साधनचं नसतात…थंडीचा कडाका, वेळी अवेळी बरसणारा पाऊस, गर्द वनराई, विरळ वस्ती पहाडी भागातले शेतीचे कष्ट, नाट्यगृहं सिनेमागृहं तर सोडाच, वीज नसल्यानं टीव्ही पाहणंही शक्य नसतं…आणि त्यातूनच व्यसन लागतं…ते आयुष्यभराचं…अरुणाचल प्रदेश…उगवत्या सूर्याचा प्रदेश…भारतातल्या याच उगवत्या सूर्याच्या प्रदेशात आयबीएन लोकमतची टीम पोहचली. सौंदर्यभूमी पण अफूच्या व्यसनाने शापित आणि हाच शाप दूर करण्यासाठी अरुणाचलमध्ये विचारांची एक नवी पहाट उगवू पाहतेय..

close