शाळेच्या दाखल्यावर जात नसावी -प्रकाश आंबेडकर

January 17, 2013 5:47 PM0 commentsViews: 91

17 जानेवारी

शाळेच्या दाखल्यावर जात नसावी आणि दलितांचं राजकीय आरक्षण रद्द करावं अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

'समाज व्यवस्था आणि व्यक्ती अशी असताना एक जीवन पध्दत सुरू झाली आहे. आज अनेक जण आंतरजातीय विवाह करत आहेत. त्यांनी हा विवाह जातीच्या विरोधात जाऊन केलेला असतो तेव्हा अशा वेळेस त्यांनी उभारलेलं सामाजिक आंदोलनाचं चित्र स्पष्ट करण्याची गरज आहे आणि हे कायद्यात राहून व्हावे त्यामुळे आंतरजातीय विवाह करण्यार्‍यांची नोंद ही धर्म आणि राष्ट्रीयत्व या आधाराचे व्हावी' अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. यामुळे जात आणि राष्ट्रीयत्व अशी जी दरी निर्माण झाली आहे ती संपवण्यास मदत होईल असंही ते म्हणाले. त्याचबरोबर दलित समाजात स्कॉलरशिप न घेणारे असे अनेक कुटुंबीय आहे ज्यांनी यावर बहिष्कार टाकला आहे. काही जणांनी आपण पुर्वश्रमी कोण होते हे जुगारून बौध्द धर्माच्या वाटेवर निघाले आहे त्यामुळे अशा वर्गासाठी कायदा असण्याची गरज आहे असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

close