गोव्यात समुद्रकिना-यावरील पार्टींना बंदी

December 20, 2008 2:34 PM0 commentsViews: 3

20 डिसेंबर पणजी गोव्यात 31डिसेंबरच्या मध्यरात्री नव-वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रावर जी पार्टी केली जाते. त्या पार्टीला यावर्षी बंदी घालण्यात आली आहे, असं गोव्या सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. गोव्यात दरवर्षी ओपन बीच पार्टी होतं असतात. मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा पार्टींना यावर्षी सुरक्षेच्या कारणावरून बंदी घालण्यात आली आहे.दरवर्षी 31 डिसेंबरला अनेक विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. पण यावर्षी ओपन बीच पार्टींना बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणावरून या पार्टींना बंदी घालण्यात आली. असं गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केलं आहे.मुंबई हल्ल्यानंतर अनेकांनी आपापले ख्रिसमस हॉलिडे प्लॅन याआधीच रद्द केले आहेत. आता अशा बंदीमुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार हे मात्र निश्चित.

close