रत्नागिरीत मच्छीमारांना सापडली 329 जिवंत काडतुसं

January 18, 2013 1:13 PM0 commentsViews: 100

19 जानेवारी

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या जाळ्यात विदेशी बनावटीची 329 जिवंत काडतुसं सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एसएलआरची 90 तर 239 लहान राऊंड आहेत. कासारवेलीतील सुनील पोमेडकर यांना मासेमारी करताना प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत ही काडतुसं सापडली. त्यांनी ही काडतुसं पोलिसांनी ताब्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे

close