पाण्यासाठी 55 किलोमीटर मानवी साखळी

January 21, 2013 12:37 PM0 commentsViews: 34

21 जानेवारी

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. पाणी,चारा मिळावा आणि अपूर्ण अवस्थेतील पाणी योजना पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं. या भागातील दुष्काळग्रस्तांनी चक्क 55 किलोमीटर अंतराची मानवी साखळी तयार केली होती. अनेक पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे,त्यासाठी सरकारकडे अनेक वेळा मागणी करुनही काही उपयोग न झाल्यानं अखेर या आटपाडी तालुक्यातील 15 गावांच्या ग्रामस्थांनी 55 किलोमीटर मानवी साखळी उभी करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. भिऊघाट ते दिघंची गावा दरम्यान उभारलेल्या या साखळीत जवळपास 3 हजार दुष्काळग्रस्तांनी भाग घेतला होता. या साखळीत लहान मुलांपासून ते वृध्दांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर गावकर्‍यांनी आपल्या जनावरांनाही साखळीत सहभागी केलं होतं.

close