सातासमुद्रापार सारस्वतांची मांदियाळी

January 21, 2013 5:30 PM0 commentsViews: 8

21 जानेवारी

अमेरिकेतील बृहन्ममहाराष्ट्र मंडळातर्फे नॉर्थ अमेरिकेत येत्या 5 ते 7 जुलै दरम्यान मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील मराठमोळ्या परंपरेशी नाती जोडणार्‍या कार्यक्रमांची रेलचेल या संमेलनात असणार आहे. या संमेलनाला अमेरिका, कॅनडासह जगभरातील देशांतून मराठी बांधव या संमेलनाला येत असतात. या संमेलनला पाच ते सहा हजार साहित्याकांनी गर्दी होत असते. दोन दिवसांच्या या संमेलनाला वेगवेगळ्या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात अशी माहिती संमेलनाच्या सचिव नम्रता दांडेकर यांनी दिली. तसंच यावेळी संमेलनाची थीम ही ऋणानुबंध आहे. काळाबाहेर गेलेलं जे साहित्य आहे त्याला नवी झळाळी देऊन साहित्यकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली आहे त्याचं सेलिब्रेशन या संमेलनात करणार आहोत अशी माहिती संमेलनाच्या सदस्या लीना देवधर यांनी दिलीय.

close