हिरव्या रानावर पांढरी चादर

January 22, 2013 11:42 AM0 commentsViews: 21

22 जानेवारी

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ इथला तलाव थंडीमुळे गोठला आहे. सुमोर एक ते दीड इंचापर्यंतचा बर्फाचा थर इथे बनला होता. काही दिवसांपासून पारा शून्यापर्यंत खाली आल्याने हिमकणांचा वर्षाव होत आहे. या परिसरात तापमान कमालीचे घटले आहे. तर दुसरीकडे विदर्भातही थंडीचा जोर आता वाढला आहे. विदर्भात सोमवारी तापमान कमाल 27. 2 आणि किमान 10. 9 नोंद झालीय.

close