‘बाळासाहेबांच्या नावापुढे स्वर्गीय लावण्यास मन धजावत नाही’

January 23, 2013 4:31 PM0 commentsViews: 42

23 जानेवारी

बाळासाहेबांची आज आठवण येते. त्यांना विसरणे शक्य नाही. त्यांना श्रद्धांजली वाहताना बाळासाहेबांच्या नावापुढे अजूनही स्वर्गीय लावायला मन धजावत नाही असे भावूक उद्गार काढलेत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

अभिनेते अमिताभ बच्चन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाची घोषणा करण्यात आली. यावेळी व्हर्च्युअल क्लास रूमच्या दुसर्‍या टप्प्याचं अनावरणही करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांनी व्हर्च्युअल क्लास रुमच्या माध्यमातून अनेक शाळांतील मुलांशी संवाद साधला. यापूर्वी 80 शाळांमध्ये सुरू असलेलं व्हर्च्युअल क्लासरूम संख्या आता 400 करण्यात आलीय. यावेळी

close