नितीन गडकरींची धमकी

January 24, 2013 12:03 PM0 commentsViews: 18

24 जानेवारी

भाजपच सरकार आल्यावर तुम्ही कुठे जाणार ? अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना धमकी दिली. भाजपच सरकार आल्यावर तुम्हाला वाचवायला कोणी चिदंबरम येणार नाही असंही गडकरींनी सुनावलं. भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीन गडकरी गुरूवारी नागपूरला पोहचले. त्यानंतर कार्यकर्त्यांपुढे भाषण करताना त्यांनी आयकर विभागाच्याच अधिकार्‍यांना धमकी दिली. कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांचं नावही आपल्याला माहित असल्याचं गडकरींनी सांगितलं. तसंच काँग्रेसविरुद्ध आता माझा खरा संघर्ष सुरू झालाय, असं सांगत त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलंय. कोणतंही पद मिळवण्यासाठी आपण राजकारणात आलो नव्हतो. आधी पदाच्या मर्यादेमुळे मला माझ्यावरील आरोपांना नीट उत्तरं देता येत नव्हती, आता मी कसं उत्तर देतो ते पाहा असा इशाराही त्यांनी दिला. नागपूरला ते चार 4 दिवस मुक्काम करणार आहेत. या दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. एका राजकीय पक्षातल्या नेत्यानं, सरकारी अधिकर्‍यांना अशी थेट धमकी दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

close