‘तालिबानी समर्थक नेत्यांसोबत संघाची झाली होती गुप्त बैठक’

January 24, 2013 3:34 PM0 commentsViews: 7

24 जानेवारी

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हिंदू दहशतवादाच्या वक्तव्याविरोधात चवताळलेल्या भाजपनं देशभर आंदोलन पुकारले आहे. पण तालिबानी समर्थक नेते मौलाना फजलुल रेहमान आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,विहिंपच्या सदस्यांसोबत गुप्त बैठक झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

जून 2005मध्ये पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते मौलाना फजलुल रेहमान भारत दौर्‍यावर आले होते तेंव्हा विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी तसेच आरएसएस आणि विहिंपच्या काही नेत्यांनी गुप्त बैठक घेऊन 3 तास चर्चा केली. ही बैठक दिल्लीतल्या संघाच्या कार्यालयात झाली होती असा सनसनाटी आरोप नवाब मलिक यांनी केलाय. मौलाना फजलुल रेहमान हे तालिबानी समर्थक नेते मानले जातात. या बैठकीबाबत विहिंप आणि संघाला विचारणा करण्यात आली पण त्यांनी एकही उत्तर दिलं नाही. तेंव्हापासून संघ आणि भाजपविरोधात संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप आणि संघाचा तालिबानी समर्थक नेत्यांशी काय संबंध आहेत ? तसेच या बैठकीचा हेतू काय होता हे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी सुद्धा नवाब मलिक यांनी केली.

close