जयपूरमध्ये 26/11 तील शहिदांना चित्रमय श्रद्धांजली

December 20, 2008 5:29 PM0 commentsViews: 9

20 डिसेंबर, जयपूर मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना देशभर श्रद्धांजली दिली जात आहे. जयपूरमधील एका तरुण चित्रकारानं आपल्या चित्रांच्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहली आहे. जयपूरच्या आर्ट स्टुडिओमध्ये चंद्रप्रकाश गुप्ता हे शहीद हेंमत करकरे आणि संदीप उन्नीकृष्णन् यांची चित्रं काढण्यात व्यस्त आहे. 26/11 हल्ल्यातील शहिदांना त्यांनी चित्रमय श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद अधिकार्‍यांच्या असामान्य शौर्यानं चंद्रप्रकाशला पोट्रेट रेखाटण्याची प्रेरणा दिलीय. हे पोट्रेट शहिदांच्या कुंटुबियांना पाठवण्याची त्याची इच्छा आहे.'मला त्यांना सांगायचं आहे की दूर राहणारा एक साधा चित्रकारही दुखात त्याच्यापाठी उभा राहू शकतो ', असं चंद्रप्रकाश गुप्ता यांनी सांगितलं. या अगोदरही चंद्रप्रकाशनं कारगील युद्धातील शहिदांना तसंच जयपूर बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना अशीच श्रद्धांजली वाहली होती. मुंबई हल्यात शहिदांपासून या तरुण चित्रकाराला प्रेरणा मिळाली. आता त्याच्या या कलाकृती इतर अनेकांना प्रेरणा देत राहणार.

close