‘ए मेरे वतन के लोगो’ गाण्याला 50 वर्ष

January 26, 2013 11:40 AM0 commentsViews: 47

26 जानेवारी

'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याला आज 50 वर्षं पूर्ण होतं आहे. राष्ट्रकवी प्रदीप यांचे शब्द, सी.रामचंद्रन यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्वर्गीय आवाजनं या गाण्याला आजरामर केलंय. भारत आणि चीन युद्धानंतर कवी प्रदीप यांनी हे गीत लिहलं होतं. हे गाणं आशा भोसले यांच्याकडून ऐकायला मिळालं असतं पण या अजरामर गीताला न्याय देण्याची ताकद फक्त लता मंगेशकर यांच्यात आहे. त्यामुळे हे गीत लतादीदींनीच गायलं पाहिजे असा हट्ट खुद्द कवी प्रदीप यांनी धरला होता. अखेर हे गीत 26 जानेवारी 1963 रोजी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर लतादीदींच्या आवाजातं सादर करण्यात आलं. यावेळी देशभक्तीनं भारलेल्या देशातला प्रत्येक नागरीक अक्षरश: ढसाढसा रडला होता. खुद्द तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

close