कोल्हापुरात केमिकल कंपनीच्या वाहनांची जाळपोळ

January 26, 2013 3:05 PM0 commentsViews: 6

26 जानेवारी

कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यातल्या हलकर्णी एमआयडीसी मधल्या ए.व्ही.एच. केमिकल कंपनीमध्ये रात्री उशीरा ग्रामस्थांनी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसंच इथल्या कर्मचार्‍यांना मारहाणही केली. यात दोन जेसीबी मशीन्स आणि एका ट्रॅक्टरचं जळून नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. या रासायनिक कंपनीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होणार असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.

close