भ्रष्टाचार सगळ्यांमध्ये असतो पण.. -आमिर खान

January 26, 2013 3:45 PM0 commentsViews: 32

26 जानेवारी

भ्रष्टाचार हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. पण जोपर्यंत समाज व्यवस्था सुधारली जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचार दूर केला जाऊ शकत नाही असं मत अभिनेता आमिर खान यांनी व्यक्त केलं. अहमदनगरमध्ये आमिर खानने स्नेहालय संस्थेनं बांधलेल्या 'सत्यमेव जयते' भवनाचं उद्घाटन केलं. सत्यमेव जयते या गाजलेल्या कार्यक्रमाच्या डीव्हीडीचं लोकार्पणही आमिरने केलं. आमिरने संस्थेची पाहणी केली आणि पीडित मुली आणि महिलांशी त्याने संवादही साधला.

close