दिल्लीत सुरक्षाविषयक बैठक

December 21, 2008 4:00 AM0 commentsViews:

21 डिसेंबर, दिल्लीपाकिस्तानने अतिरेकी संघटनांवर कारवाई नाही केली.. तर भारतासमोर कोणकोणते पर्याय आहेत, याचा आता भारत विचार करतोय. शनिवारी रात्री राजधानीतल्या साउथ ब्लॉकमध्ये एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षाविषयक बैठक झाली. पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेकी ठिकाणांवर हल्ले करावेत का ? त्यासाठी भारतीय लष्कराची तयारी आहे का ? देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कितपत कडक आहे ? अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री ए के अ‍ॅंटनी, गृहमंत्री पी चिदंबरम आणि तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन आणि सगळ्या गुप्तचर संस्थांचे प्रमुखसुद्धा उपस्थित होते.

close