सोनई हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना मदत

January 30, 2013 3:27 PM0 commentsViews: 70

महिन्याभरानंतर सोनई हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना मदतदीप्ती राऊत,अहमदनगर

30 जानेवारी

अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी आयबीएन लोकमतनं आवाज उठवल्यावर सरकारला जाग आलीय. समाजकल्याण अधिकार्‍यांनी तातडीनं पीडित कुटुंबीयांना मदत दिली. मात्र दुसरीकडे राजकीय दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय.

सोनई इथल्या पीडित कुटुंबावर कोणतीही दहशत नाही, असा दावा अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे करत आहेत. मात्र आजही दहशतीच्याच सावटाखाली जगावं लागत असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.

दलित तरुणांना गवत कापणीच्या विळ्यावर तुकडे करण्यात आलेली ही विदारक घटना मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही अद्याप पीडित कुटुंबांना भेटण्याचं दायित्त्व दाखवलं नाही. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासारखे आदर्श कायदे फक्त कागदावरच दिसत आहेत. तब्बल एक महिन्यानंतर सरकारी सूत्रं हलली आणि पीडित कुटुंबापर्यंत मदतीचा धनादेश पोहचला. मेहेतर समाजातल्या या तरुणांची एवढी निर्घृण हत्या का झाली, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातला स्थानिक पातळीवरचा राजकीय दबाव एवढा तीव्र आहे की, माणुसकीच्या खांडोळ्या उडूनही साक्षीदार आणि पंच पुढे यायला घाबरत आहेत.

close