एका ‘पहिलवान’ कलेची गोष्ट !

January 30, 2013 12:55 PM0 commentsViews: 36

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

30 जानेवारी

कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्तीत रमलेल्या एका पहिलवानाला एका अनोख्या कलेनं झपाटलं आणि एका खेडेगावात उभी राहिली एक अनोखी आर्ट गॅलरी…

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडीजवळंच चिंचोली गाव…आणि या गावातली ही आर्ट गॅलरी आज कलाप्रेमींसाठी एक आकर्षण ठरली आहे. अशोक जाधव या कलाशिक्षकाच्या कलासाधनेतून हे कलादालन उभं राहिलंय. या कलादालनात पिंपळाच्या पानावर साकारलेली ही हुबेहुब चित्रं असू देत किंवा निसर्गातल्या टाकाऊ लाकडातून साकारलेली ही काष्ठशिल्प असू देत…कलाप्रेमींसाठी हा एक वेगळा अनुभवचं..

अशोक जाधव हे याआधी लाल मातीत पैलवानकी करायचे मात्र त्यांना काष्ठशिल्पकला आणि चित्रकलेत आवड निर्माण झाली. त्यानंतर या कलेला व्यासपीठ असावं म्हणून त्यांनी हे कलादालन तयार केलं.जाधव यांच्या या कलेची दखल घेत त्यांना शालेय शिक्षणातल्या सातवीच्या बालभारतीच्या मराठी पुस्तकातली चित्र काढण्याची संधी मिळाली. जाधव यांच्या या कामात त्यांची पत्नीही हातभार लावतेय. जाधव यांच्या या काष्ठशिल्पांमुळं निसर्गाकडं पाहण्याचा आपला दृष्टीकोन निश्चितपणे बदलेल.

close