पाकवर वाढता दबाव

December 21, 2008 5:00 AM0 commentsViews: 3

21 डिसेंबरसुर्या गंगाधरनस्टार्टफोर या आंतरराष्ट्रीय इंटलिजन्स एजन्सीनं दावा केलाय की भारत पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले करण्याची तयारी करत आहे. त्याला भारताकडून औपचारिक दुजोरा मिळाला नसला तरी भारताने पाकिस्तानवरचा व्यूहात्मक दबाव मात्र आता कमालीचा वाढवला आहे. पाकिस्तानने अतिरेकी ठिकाणांवर कारवाई केली नाही तर आमच्या समोर सगळे पर्याय खुले आहेत, असं परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.26 नोव्हेंबरला ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांची सर्व माहिती भारताने इंटरपोलला दिली आहे. आता इंटरपोल त्यांच्याविषयी पाकिस्तानकडे चौकशी करणार आहे. पण भारताला याही पेक्षा महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाचं उत्तर हवं आहे – पाकिस्तानवर राज्य करणारी व्यक्ती कोण आहे. झरदारी ?की लष्कर प्रमुख कियानी?प्रणव मुखर्जींचं म्हणणं आहे की. मुंबईवरचा हल्ला आखणा-या अतिरेक्यांना झरदारी सरकारने शिक्षा द्यायलाच हवी. अमेरिकेचीही हीच भूमिका आहे. "पाकिस्तान सरकारने काही पाउलं उचलली आहेत, पण ती पुरेशी नाहीत. आम्ही समजू शकतो की पाकिस्तानमधलं नागरी सरकार नवं आहे आणि म्हणूनच त्यांना थोडा वेळ लागत आहे" असं अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी स्पष्ट केलं.पण अतिरेक्यांवर कारवाई करणं पाकिस्तानला शक्य नसलं तर ? किंवा तसं करण्याची त्यांची इच्छाच नसली तर ? मुखर्जी म्हणतात की भारतासमोर सगळे पर्याय खुले आहेत. त्यांच्या या विधानामुळे अमेरिकेतल्या स्ट्रॅटफोर या गुप्तचर संस्थेच्या दाव्याला दुजोरा मिळतो. स्ट्रॅटफोरनुसार पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले करण्यास भारताची तयारी पूर्ण झाली आहे.आणि भारतीय लष्कर केवळ केंद्र सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या शक्तिशाली मित्रदेशांच्या संपर्कात आहे. "चीनसारखे मित्र आमच्या पाठीशी असताना आम्ही एकटे कसे पडू शकतो ?" असा प्रश्न पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी विचारला आहे.भारताला कल्पना आहे की पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून. पाकिस्तानातून दहशतवादाची पाळंमुळं नष्ट होणार नाहीत.. पण अशा हल्ल्यांना प्रतीकात्मक महत्त्व असतं. विशेषत: निवडणुका जवळ आल्या असताना!

close