शिवतरची शौर्यगाथा

January 30, 2013 3:17 PM0 commentsViews: 209

" मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे , देश रक्षावया धर्म तारावया पाय आता न मागे फ़िरे.. ..वादळाशी झुंजतो" भारतीय सैन्यदलातल्या मराठा बटालीयन मधून निवृत्त झालेले हे शूर सैनिक आहेत रत्नागिरीतल्या शिवतर गावातले. शिवतर.. सह्याद्रीची छाती असलेलं लढवय्यांचं गाव. घर तेथे फ़ौजी अशी या गावाची शेकडो वर्षांपासूनची परंपरा. गावाच्या वेशीवरच आहे हा ऐतिहासिक रणस्तंभ. आणि या रणस्तंभावरची ब्रिटिशांनी लावलेली ही पाटी आठवण करून देतेय पहिल्या महायुध्दाची.! 1914 ते 1939 या काळात जर्मनीविरुध्द लढल्या गेलेल्या या महायुध्दात शिवतर गावातल्या 234 शूर जवानांनी ब्रिटिश सैन्यातून लढ़ताना मोलाची कामगिरी बजावली . त्यात 18 जवान शहीद झाले. त्याची आठवण म्हणून ब्रिटिशांनी बांधलेल्या रणस्तंभाचा या गावाला प्रचंड अभिमान आहे. त्यानंतर 1939 ते 1942 मध्ये झालेल्या दुसर्‍या महायुध्दातही शिवतरमधले अनेक जवान शहीद झाले. म्हणूनच गावाच्या नव्या पिढीचा प्रत्येक जवान गावात येताना पहिला सॅल्यूट देतो तो या रणस्तंभाला…अशा लढवय्या गावाची ही कहाणी रिपोर्ताज…

close