बारामतीकरांच्या भेटीला ‘डान्सिंग बर्ड’

January 31, 2013 11:31 AM0 commentsViews: 10

31 जानेवारी

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात बारमतीकरांना भेटायला काही वेगळेच पाहुणे येतात. युरोपियन भोरड्या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी संध्याकाळच्या सुमारास बहारदार नृत्य करतात. एकाचवेळी या थव्यामध्ये हजारो पक्षी असतात. साधारणत: ज्वारीच्या शेतात हे पक्षी पाहिले जातात यांना गुलाबी भोरड्या म्हणूनही ओळखलं जातं. वर्षभरातून फक्त याच काळात हे पक्षी बारामतीत पहायला येतात. हे पक्षी पूर्व युरोपमधून तुर्कस्थान अफगाणिस्तानमार्गे भारतात येतात.

close