मोहाली टेस्टमध्ये भारताची स्थिती मजबूत

December 21, 2008 7:45 AM0 commentsViews: 1

21 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टमध्यला तिसर्‍या दिवशी सुरुवातीच्या धक्क्यानंतर इंग्लंड टीम सावरलीय अस वाटत असतानाच भारताने त्यांना आणखी एक धक्का दिला. कूक आणि कॅप्टन पीटरसनने संयमी खेळ करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण ओपनर कूक 50 रन्स काढुन पॅव्हेलियनमध्ये परतला. झहीर खानने त्याला आऊट करत मॅचमधली दुसरी विकेट पटकावली. दरम्यान पीटरसननेही कारकिर्दीतली 12वी हाफ सेंच्युरी ठोकली. पहिल्या सत्रातही भारताने आपलं वर्चस्व गाजवलं होतं. त्यांनी सुरूवातीलाच इंग्लंडला दोन धक्के दिले होते. दिवसातल्या तिसर्‍या बॉलवर झहीरने ओपनर अ‍ॅण्ड्र्यु स्ट्रॉसला एलबीडबल्यु आऊट केलं. त्यावेळी इंग्लंडच्या रन्सचा भोपळाही फोडता आला नव्हता. भारतीय बॉलर्सने या झटक्यातुन इंग्लंडला सावरायला वेळही दिला नाही. दिवसाच्या दुसर्‍या ओव्हरमधल्या पहिल्या बॉलवरच ईशांत शर्माने बेलला बोल्ड केलं.