राज ठाकरेंनी मनसे विसर्जित करून महायुतीत यावं -आठवले

February 2, 2013 11:39 AM0 commentsViews: 26

राज ठाकरेंनी मनसे विसर्जित करून महायुतीत यावं -आठवले02 फेब्रुवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंकडे ऐक्याचा हात पुढे केल्यामुळे शिवसेना- मनसे एकत्र येणार का ही चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांनी आपला पक्ष विसर्जित करून शिवसेनेत पुन्हा सामिल व्हावं. जर राज ठाकरे महायुतीत आले तर युतीची ताकद वाढेल असा खोचक सल्ला रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. तसंच आता शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी उद्धव विराजमान झाले आहे. राज ठाकरे शिवसेनेत आल्यावर त्यांनी कार्याध्यक्षपद स्विकारावं असं मतही आठवलेंनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे मनसे शिवसेनेत येणार यांची चर्चा सुरू होती तेंव्हा रामदास आठवले यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. मनसे जर महायुतीत येणार असेल तर महायुतीतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. आता खुद्द रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

close