महिलांना स्वसंरक्षणासाठी ‘मार्शल आर्ट’चे प्रशिक्षण

February 4, 2013 4:51 PM0 commentsViews: 38

04 फेब्रुवारी

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. देशभरात महिलांना सुरक्षा देण्यासाठी उपयायोजना आखल्या जात आहे. नागपूरमध्ये महिलांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट ट्रेनिंग देण्यासाठी महिलांच्या एका बॅचला होमगार्ड ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या महिला नंतर स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे शहरातील 50 हजार महिलांना देणार आहेत. या बॅचमध्ये 50 ग्रामीण महिला पोलीस, 25 नर्स, 250 होमगार्ड्स महिला आहेत. या महिलांना मार्शल आर्ट देण्यासाठी खास काश्मीरमधून दोन ट्रेनर्सना बोलावण्यात आले आहे.

close