प्राजक्ता धुळप यांना ‘लाडली मीडिया’ पुरस्कार

February 5, 2013 5:16 PM0 commentsViews: 41

05 जानेवारी

आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आयबीएन लोकमतच्या डेप्युटी फीचर एडिटर प्राजक्ता धुळप यांना 'कोल्हापूरच्या लेकी' या रिपोर्ताजसाठी यंदाचा 'लाडली मीडिया मीडिया राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात पॉप्युलेशन फर्स्टचे ट्रस्टी बॉबी सिस्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2007 पासून पॉप्युलेशन फर्स्ट संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार दिले जातात. 'कोल्हापूरच्या लेकी' या रिपोर्ताजमध्ये वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या आणि दोषी यंत्रणेचा पर्दाफाश करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं 'सायलेंट ऑब्झर्वर' यंत्रणा तयार केली होती. त्याचा आढावा या रिपोर्ताजमध्ये घेण्यात आला होता. या रिपोर्ताजचे चित्रण केलं होतं व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश काळे यांनी तर व्हिडिओ एडिटर शंकर कांबळे यांनी एडीटिंगची जबाबदारी पार पाडली होती.

close