विद्यापीठाचा भोंगळ कारभार, त्याला केलं ती !

February 6, 2013 4:09 PM0 commentsViews: 32

06 फेब्रुवारी

मोठ्या उमेदीनं तुम्ही पदवीचं शिक्षण घेतात आणि तुमच्या मार्कशिटवर तुमच्या ऐवजी मुलीचा फोटो लावला गेला तर तुम्हाला कसे वाटेल. मुलगी असला तर धक्का बसेल आणि मुलगा असले तर आणखी जबरदस्त धक्का बसेल..असाच एक धक्का बसला आहे अंबरनाथमध्ये राहणारा स्वप्नील भांबरेला. त्याचं झालं असं की, स्वप्निल हा कला शाखेत शिकत होता. त्याने तृतीय वर्षांची अखेरची परीक्षा दिली. त्याचा निकाल आला. आणि जेव्हा मार्कशिट हातात पडली ती त्याच्या हातातून खालीच पडली. कारण त्याच्या मार्कशिटवर एका मुलीचा फोटो लावण्यात आला होता. आणि हा कारभार केला होता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने. झालेल्या प्रकारमुळे संतापलेल्या स्वप्निलने कलिना येथील विद्यापीठाचे परीक्षा विभाग गाठले. रितसर त्यांने तक्रार दाखल केली. पण शेवटी विद्यापीठाचे परीक्षा विभाग. तब्बल दोन महिने उलटत आले आहे पण अजूनही विभागाने आपली चूक सुधारलेली नाही. विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे स्वप्निलला एम.ए.साठी प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया गेलं आहे. विद्यापीठाने लवकरात लवकर मार्कशिट सुधारून द्यावी अशी विनंती आता स्वप्निलने केली आहे.

close