अरुण गुजराथींचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा

December 21, 2008 9:11 AM0 commentsViews: 4

21 डिसेंबर, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. येत्या 23 तारखेला नागपूरमध्ये होणार्‍या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव निश्चित होणार आहे. या पदासाठी आर.आर.पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. नागपूरच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. आर.आर.पाटील यांच्या नावाला शरद पवार ही अनुकूल आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर.आर.पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

close