अजूनही देश सुराज्याच्या प्रतीक्षेत -मोदी

February 6, 2013 2:21 PM0 commentsViews: 40

06 फेब्रुवारी

स्वराज्य मिळालं, पण स्वराज्याच्या सहा दशकांनंतरही देश सुराज्याच्या प्रतीक्षेत आहे असं परखड मत गुजराजतचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी यांनी व्यक्त केलं. दिल्लीतल्या श्रीराम कॉलेजमध्ये मोदींचं व्याख्यानं आयोजित करण्यात आलं होतं. गुजरातच्या विकासाची आज देशभर चर्चा होतेय आम्ही सुराज्यावर भर दिला. सध्याची परिस्थिती पाहिली तर देश निराशेच्या गर्तेत आहे. देशात भ्रष्टाचार फोफावलाय अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. जगभरात भारत सर्वात तरुण देश आहे. 60 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची असतानाही आपण युवाशक्तीचा योग्य वापर करु शकलो नाही, आपण संधी गमावत चाललो आहोत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सभागृहात मोदींचे भाषण सुरू असताना डाव्या चळवळतील विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली.

close